अभ्यास व व्यायाम महत्वाचे - शर्मिला पवार
महाराष्ट्र लीग कराटे स्पर्धा बारामती मध्ये संपन्न
बारामती: प्रतिनिधी
महिला व मुलींनी स्वसंरक्षण साठी कराटे खेळ शिका त्याच बरोबर अभ्यास व व्यायाम सुद्धा जीवनात गरजेचा असल्याचे शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सांगितले.
राज्यातील सर्वात महत्वाची व मोठी महाराष्ट्र लीग कराटे स्पर्धा बारामती कराटे असोसिएशन व शरयु फौंडेशन च्या वतीने २१ व २२ रोजी बारामती मध्ये संपन्न झाली तिच्या उदघाटन प्रसंगी शर्मिला पवार कराटे स्पर्धकांना मार्गदर्शन करत होत्या .
यावेळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे , इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,शरयु फौंडेशनचे सदस्य ऍड.रोहित काटे , विक्रम निंबाळकर व बारामती कराटे असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र कराळे यांच्या उपस्तीत झाले तर बक्षिस वितरण विद्या प्रतिष्ठान चे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले.
स्पर्धेतील विजेत्याना
बेस्ट प्लेअर्स साठी स्पोर्ट्स सायकल व खेळाडूंना विविध वैयक्तिक गटामध्ये रोख बक्षिसे व करंडक तर तसेच सांघिकमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पिंपरी चिंचवडच्या विश्वा स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला तर दुसऱ्या क्रमांकाचे सांघिक पारितोषिक कोल्हापूरच्या टुस्को कोल्हापूर संघाला , तृतीय क्रमांकाचे रांजणगाव पुणे ग्रामीणच्या द चॅम्पियन्स कराटे क्लब या संघाला मिळाले.
राज्यातील १२०० खेळाडूंनी सदर स्पर्धे मध्ये सहभाग घेतला असल्याचे मुख्य प्रशिक्षक रवींद्र कराळे यांनी सांगितले .
महाराष्ट्र कराटे लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र करळे याच्यासह अभिमन्यू इंगुले, महेश डेंगळे,शिवाजी भिसे, राहुल सोनवणे,मुकेश कांबळे, आयेशा शेख, श्रुती पानसरे, पूजा खाडे, ऋषिकेश मोरे,हर्ष भोसले, जय साबळे, तेजस्विनी जगताप , फराजणा पठाण आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment