काश्मीर ते कन्याकुमारी सायकलने बारामतीच्या देशमाने यांची सफर संपन्न
बारामती:
येथील एकनाथ देशमाने यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या दोन महिन्यांत काश्मीर ते कन्याकुमारी असे ४४५० कि. मी अंतर सायकलरून एकट्याने पार केले. या कालावधीत अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले, मात्र त्यावर मात करत त्यांनी ही वाटचाल पूर्ण केली.
एकनाथ देशमाने यांनी २०१९ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १४ हजार कि. मी सायकलवरून प्रवास करीत भारतासह नेपाळ व म्यानमारच्या हद्दीतून भारतभ्रमण केले आहे. 'सायकल चालवा-पर्यावरण वाचवा', 'प्लॅस्टिकचा वापर टाळा', 'बेटी बचाव बेटी पढाओ'
आदी संदेश या भ्रमंतीदरम्यान देशमाने यांनी दिला व माहिती पत्रके वाटली.
बारामतीतील अनेक दानशूरांनी त्यांच्या या भारतभ्रमंतीसाठी त्यांना मदतीचा दिली त्या आधारे त्यांनी भारत भर सायकल चालवत सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत
Post a Comment