रोहिणी आटोळे यांना नवदुर्गा महिला समाजरत्न पुरस्कार
बारामती:
डॉर्लेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी हरिभाऊ आटोळे-खरसे यांना जाणीव प्रतिष्ठान बारामती यांच्या वतीने नवदुर्गा व महाराष्ट्र व्यावसायिक संघटना पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सहेली फाउंडेशन बारामतीच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षा रोहिणी खरसे- आटोळे यांना रविवारी (ता. २२) जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते संजय खापरे आणि जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मोरे यांच्या हस्ते शारदानगर, माळेगाव येथे नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर शुक्रवारी (ता. २७) व्यावसायिक संघटना पुणे यांच्या वतीने खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे व प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, पुणे येथे महिला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आटोळे यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन तसेच स्वतः अनेक उपक्रम राबवून आरोग्य, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रात भरीव योगदान दिले. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, शालेय मुलांसाठी शालेय साहित्य, गणवेश वाटप, खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य व किट वाटप, शाळेला संगणक, अंगणवाडीतील मुलांसाठी खाऊवाटप, धार्मिक कार्यक्रमात अन्नदान, गौरी गणपती सजावट स्पर्धा, महिलांसाठी फॅशन शो, दहीहंडीचे आयोजन, मंगळागौर स्पर्धा, आदी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिवाय गेल्या तीन वर्षापासून वटपौर्णिमेनिमित्त ५१ झाडांचे वृक्षारोपण केले आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन दोन्ही संस्थांच्या वतीने पुरस्कार दिलाआहे. एकाच आठवड्यात दोन्ही पुरस्कार मिळाल्याने परिसरात आटोळे यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment