८ गावातील शेतकऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढुन सागर जाधव यांच्या उपोषणास पाठिंबा
मोरगाव :- दुधाला ४२ रुपये हमीभाव मिळण्यासाठी तरडोली ता. बारामती येथील युवा शेतकरी सागर पंडीत जाधव यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील कोऱ्हाळे, बजरंगवाडी, वडगाव निंबाळकर, कुरणेवाडी , लाटे , लोणी भापकर , मुढाळे , व खामगळवाडी, तरडोली गावातील शेतकऱ्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली होती. कोऱ्हाळे ते उपोषणस्थळी तरडोलीपर्यंत शेतकऱ्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढुन शासनाविषयी तिव्र संताप व्यक्त केला आहे.
दुधाला हमी भाव मिळण्यासह सुरु असलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी तालुक्यातील कोऱ्हाळे, बजरंगवाडी, वडगाव निंबाळकर, कुरणेवाडी , लाटे , लोणी भापकर , मुढाळे , व खामगळवाडी , सह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी येथील कोऱ्हाळे ते तरडोली येथील उपोषण स्थळापर्यंतभव्य मोटारसायकल रॅली काढली होती. यावेळी निसर्गराज खोमणे, राहुल खोमणे, पृथ्वीराज नलवडे , सतीश शेरे , सर्जेराव गाडे , दिनेश भोसले , अनिल कदम , महेंद्र तांबे ,शरद भापकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील दुग्ध उत्पादक व शेतकऱ्यांचा मिळत असलेला प्रतीसादामुळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना करताना सागर जाधव यांनी सांगितले की हे उपोषण शरीरात प्राण असेपर्यंत करणार असून जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही यावेळी त्यांना आश्रृ अनावर झाले.
आज शेतकरी व दुग्ध उत्पादकांच्या निघालेल्या भव्य रॅली मध्ये सुमारे दोनशे पेक्षा अधीक दुचाकी होत्या . शेतकरी एकजुटीच्या घोषणा देत ही रॅली शांततेने तरडोली ते मोरगाव येथे गेली येथील मुख्य चौकामधुन पुन्हा तरडोली येथे आल्यानंतर मान्यवरांनी दुध दरवाढीबाबत आपले मत व्यक्त केले.दरम्यान सुपा पोलीस स्टेशनचे नागनाथ पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेऊन शांततेने आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन केले
Post a Comment