News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती तालुक्यात आढळल्या ३ हजार ४३९ कुणबी नोंदी- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती

बारामती तालुक्यात आढळल्या ३ हजार ४३९ कुणबी नोंदी- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती


बारामती, दि.२२:
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तहसिल कार्यालयाअंतर्गत कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आजपर्यंत एकूण ३ हजार ४३९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

तालुक्यात २२ गावाच्या एकूण ९९ हजार ९७९ दप्तरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव क.प., देऊळगाव रसाळ,  जळगाव सुपे, कांबळेश्वर, उंडवडी क.प. नारोळी  नेपवतळण, कोळोली आंबी खुर्द, मुरुम, वढाणे, वाकी, पणदरे, नीरा वागज, शिर्सुफळ, सोनवडी सुपे,  जोगवडी, कारखेल, मुर्टी, करंजे, शिरवली, अंजनगाव या गावाच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत.

तालुका स्तरावर सन १९४८ पूर्वीची आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत. बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षीत व्यक्तींचे सहकार्य घेण्यात आले आहे, अशीही माहिती श्री. नावडकर यांनी दिली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment