News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

'बारामती पॉवर मॅरेथॉन'च्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

'बारामती पॉवर मॅरेथॉन'च्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

 बारामती, दि. २५: बारामती स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे २६ नोव्हेंबर रोजी आयोजित 'बारामती पॉवर मॅरेथॉन' स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत शहर व परिसरातील वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

भिगवण रोडने येणाऱ्या वाहतुकीत बदलकरीता पर्यायी मार्ग: रुई, सावळ, वंजारवाडी, कन्हेरी या ठिकाणाहून बारामतीकडे येणाऱ्या वाहनांनी पेन्सील चौकातून न येता पालखी महामार्गाचा वापर करुन माळावरची देवी इंदापुर रोड मार्गे बारामती येथे यावे. बारामतीमधून भिगवणकडे येणारी वाहतूक सम्यक चौक, जैन मंदिर या ठिकाणी न येता पिंपळी लिमटेक मार्गे पालखी महामार्गे वळविण्यात येत आहे.

देशमुख चौक, सातव चौक या ठिकाणाहून येणारी वाहतूक सम्यक चौकाकडे न येता रेल्वे उड्डाणपुलावरुन येवून पहिला टर्न मारुन वैद्यकीय महाविद्यालय, महिला रुग्णालयाकडे वळविण्यात येत आहे. बारामती विमानतळ तांदुळवाडीकडून येणारी वाहतूक पेन्सिल चौकाकडे न येता वैद्यकीय महाविद्यालयासमोरील महिला रुग्णालयाकडे रेल्वे उड्डाण पुलावरुन उजवीकडे वळून सातव चौकाकडे  वळविण्यात येत आहे. 

पेन्सिल चौक ते पंचायत समितीकडे येणाऱ्या नागरिकांनी दोन्ही बाजूच्या सेवा मार्गाचा वापर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment