विद्या प्रतिष्ठानच्या सायबरस्मार्ट प्रोग्रॅम ला उत्स्फूर्त प्रतिसाद. १०५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सायबरस्मार्ट कोर्स केला पूर्ण
बारामती:प्रतिनिधी
डब्ल्यू .एन. एस, केअर्स फाउंडेशन संस्था शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षे संदर्भात जागृती करण्याचे काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून मुलांमध्ये सायबर सुरक्षित वर्तन वाढवण्यासाठी संस्थेने सायबरस्मार्ट पोर्टल २०२० मध्ये देशात सुरू केले आहे. सायबरस्मार्ट पोर्टल हे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक आणि पालक यांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक समग्र सायबर सुरक्षा शिक्षण इकोसिस्टम आहे.
आजकाल शालेय मुलांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता वापर हा चिंतेचा विषय आहे आणि यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षे संदर्भात जागरूकता निर्माण करणे विशेष महत्वाचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ने डब्ल्यू एन एस केअर्स फाउंडेशन शी टाय उप करून सायबरस्मार्ट प्रोग्रॅम संस्थेच्या सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला.
सायबरस्मार्ट प्रोग्रॅमला संस्थेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत १०५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सायबरस्मार्ट कोर्स पूर्ण केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोर्स पूर्ण करण्याची कदाचित देशातील हे पहिलेच उदाहरण आहे.
केअर्स फाउंडेशन संस्थेने विद्याप्रतिष्ठानच्या शाळांना या अतुलनीय कामगिरीबद्दल सायबरस्मार्ट स्कूल असे विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे. ज्या शाळांना सायबरस्मार्ट स्कूल पुरस्कार मिळाला त्या पुढील प्रमाणे: अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, मराठी मीडियम स्कूल बारामती, नांदेडसिटी पब्लिक स्कूल, मगरपट्टासिटी पब्लिक स्कूल, भोर इंग्लिश मीडियम स्कूल, सुपे इंग्लिश मीडियम स्कूल, सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल
सायबरस्मार्ट प्रोग्रॅम विद्या प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये राबविण्यासाठी सर्व शाळांचे प्राचार्य आणि शिक्षक समन्वयक यांनी मोलाची कामगिरी बजाविली अशी माहिती संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे यांनी दिली. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शाह, श्री किरण दादा गुजर, श्री मंदार सिकची आणी मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी सायबरस्मार्ट कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.
Post a Comment