बारामती ! ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलिसांचा रूट मार्च
बारामती
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मेडद, कऱ्हावागज्, पवईमाळ, धुमाळवाडी, म्हसोबानगर या एकूण 05 ग्रामपंचायत च्या थेट सरपंचपद व सदस्यपद निवडीसाठी दिनांक 05 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन कडून कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून आज दि4 रोजी मौजे मेदड आणि मौजे कऱ्हावागज् या दोन गावातील गावठाण हद्दीत पथ संचलन (रुटमार्च) घेण्यात आलेले आहे.
सदर पथसंचालन मध्ये माळेगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांचे सह 15 पोलीस अंमलदार, 15 होमगार्ड, बारामती दंगल नियंत्रण पथक मधील एकूण 14 पोलीस अंमलदार व 2 वाहने सहभागी झालेले होते.
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने सर्व उमेदवार, कार्यकर्ते यांचेसह मतदार यांनी आदर्श आचारसंहिता पालन करणेचे आवाहन माळेगाव पोलीस कडून करणेत आलेले असून बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
Post a Comment