News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

गोदरेज ट्री एथलॉनचा मानकरी "ओम सावळेपाटील"

गोदरेज ट्री एथलॉनचा मानकरी "ओम सावळेपाटील"

राज्यातील स्पर्धकांचा सहभाग व पर्यावरण चा प्रसार 

बारामती: प्रतिनिधी
बारामती एमआयडीसी येथे पर्यावरण चा संदेश देण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने रविवार ५ नोव्हेंबर रोजी भारत फोर्ज ते सह्याद्री काऊ फार्म  पर्यंत (१५ किमी)   गोदरेज ऍग्रोवेट लि आयोजित गोदरेज समृद्धी ट्री एथलॉन 2023 च्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष खुल्या गटात  बारामती सायकल क्लब चा खेळाडू ओम सावळेपाटील याने १५ किलोमीटर चे अंतर ५९ मिनिट व 11 सेकंदात  पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला .
या प्रसंगी कंपनीचे अधिकारी एस.वरदराज, विवेक रायझदा, दीपक कोळेकर, अभिमन्यू ढोले, ज्योतिराम चव्हाण, देवेंद्र राऊत, संपत सुंदर, ओंकार पोटे, संदीप मोरे ,आबासाहेब भोईटे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक केसरकर, अग्निशमन अधिकारी महेश इंगवले  व इतर मान्यवर उपस्तीत होते.
दुसरा क्रमांक युवराज भोसले, तिसरा क्रमांक दादासो सत्रे यांनी मिळवला .
१५ किलोमीटर महिला मध्ये प्रथम काजल गावडे, दीपाली जगताप, डॉ. नंदिता देवकाते व ५ किलोमीटर पुरुष मध्ये चंदन कुमार, अजित कुमार, सुजित कुमार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा तर ५ किलोमीटर महिला आरती कदम, मनीषा शिंदे व सोनाली ठवरे या विजेत्या ठरल्या.

पुरुष कर्मचारी १५ किमी मध्ये तुषार धोंडे, विबिशन पवार, पांडुरंग पवार तर ५ किमी पुरुष कर्मचारी समाधान कातुरे, रोहन चांदगुडे व सूरज वाघ तर महिला कर्मचारी ५ किमी मध्ये अक्षदा शेंडगे, श्रद्धा कोडकर व प्रियांका खामगळ  या विजेत्या ठरल्या .
प्रत्येक सहभागी ना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

प्रत्येक खेळाडूंनी घरासमोर, शेतात, अपार्टमेंट मध्ये वृषरोपण करावे म्हणून रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वर्षी मोठे झालेल्या त्याच रोपट्या बरोबर सेल्फी घेऊन येणाऱ्यास मॅरेथॉन मध्ये  मोफत नोंदणी   केली जाणार असल्याचे गोदरेज ऍग्रोवेट च्या वतीने ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील आठशे स्पर्धकांनी या मध्ये भाग घेतला आभार संदीप मोरे यांनी मानले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment