बारामती मध्ये इंग्लिश मेडिअम स्टूडेंट स्पोर्ट्स असोसिएशन ची स्थापना
राज्यभर विध्यार्थी व क्रीडा शिक्षक साठी कार्य
बारामती: प्रतिनिधी
अभ्यासा बरोबर मैदानातील खेळाचा सराव होऊन विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करावी व त्याच बरोबर क्रीडा शिक्षक यांना सुद्धा न्याय मिळावा या उदेश्याने बारामती तालुक्यात इंग्लिश मेडिअम स्टूडेंट स्पोर्ट्स असोसिएशन ची स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष आशिष डोईफोडे, उपाध्यक्ष श्रीराम इंगोले, सचिव संतोष कसबे ,कार्याध्यक्ष गणेश काकडे आदी पदाधिकारी यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना अभ्यासा शिवाय क्रीडा क्षेत्रा साठी कमी वेळ भेटतो त्यामुळे इच्छा असूनही आवडत्या खेळा मध्ये यश मिळवता येत नाही, त्यामुळे क्रीडा विभागात विकास करणे, विविध उपक्रम राबिवने , तालुका,जिल्हा व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धाच आयोजन करने त्यानंतर यशस्वी खेळाड़ू साठी क्रीड़ा शिष्यवृत्ति योजना सुरु करने
इंग्रजी माध्यम शाळा मध्ये क्रीड़ा प्रशिक्षक व शिक्षक नेमावा या साठी प्रत्यन करणे व रोजगार निर्मिती क्रीडा शिक्षकांना करून देणे,क्रीडा विषयक निबंध, चित्रकला स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा भरविणे ज्यामुळे मुलांना जागतिक स्तरावरील क्रीडा घडामोडी कळाव्यात,शासन दरबारी क्रीडा विषयक प्रश्नांना साठी पाठपुरावा करणे , संघटना मजबुत करणेसाठी तालुका ,जिल्हास्तरावर पदाधिकारी नेमणे आणि इतर राज्या प्रमाणेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी व क्रीडा शिक्षक यांना खेळासाठी न्याय मिळावा व राज्यातील एक तरी खेळाडू कोणत्याही खेळा मध्ये ऑलीम्पिक मध्ये जावा या साठी शोध घेऊन त्यास सर्वतोपरी मदत करणे हे अंतिम ध्येय इंग्लिश मेडिअम स्टूडेंट स्पोर्ट्स असोसिएशन चे असल्याचे अध्यक्ष आशिष डोईफोडे यांनी सांगितले.
Post a Comment