News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

काकडे महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान संपन्न

काकडे महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान संपन्न


                                   सोमेश्वरनगर - येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार माननीय करे साहेब होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. यावेळी व्यवस्थापन समितीचे सचिव श्री.सतीशराव लकडे, वडगाव निंबाळकरचे मंडल अधिकारी मा. देस्तेवाड, संजय खाडे, आगम भाऊसाहेब, विनोद परकाळे, अमोल सोनवणे उपस्थित होते.                                     
               मा. करे साहेब यांनी भारत सरकार व भारतीय निवडणूक आयोगानुसार नवीन मतदार नोंदणी सुरू आहे तरी 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन केले, तसेच विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी महाविद्यालयात कॅम्पचे आयोजन केले जाईल असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.तसेच मु.सा.काकडे महाविद्यालयाचा परिसर हिरवाईने दाटलेला पाहून समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून, संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे असे विचार मांडले .
              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांनी केले, तर यावेळी इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी वर्गातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले, याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.खोमणे जे.एन.यांनी केले तर आभार प्रा.रवींद्र होळकर यांनी मानले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment