समाजातील सर्व घटक प्रवास करतील तेव्हा एसटीचे भाग्य बदलेल
बारामती विभागातील एसटी कर्मचारी सुद्धा सहभागी
बारामती: प्रतिनिधी
चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी , डॉक्टर ,वकील ,शेतकरी यासह समाजातील सर्व घटक एसटीने प्रवास करत होते. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. काळानुसार एसटीच्या सेवेत काही बदल करणे आवश्यक असून ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. येत्या तीन वर्षात एसटीची सेवा सुधारलेली दिसेल. समाजातील सर्व घटक प्रवास करतील तेव्हा एसटी भाग्य बदलेल असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
शुक्रवार ०१ डिसेंबर येथे येथे झालेल्या त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप ,महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे ,एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले, एसटीचे अधिकारी बलभीम पाटील,कामगार संघटना बारामती एसटी विभागीय कार्यशाळा चे राजेंद्र भोसले, मनोज जगताप, संदीप देवकाते,बारामती आगार चे राजेंद्र पवार व बारामती, इंदापूर, फलटण आगारातील कर्मचारी ,पदाधिकारी उपस्तीत होते.
यावेळी बोलताना चन्ने म्हणाले की, काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. एसटीचा दर्जा , स्वच्छता सेवा यामध्ये सुधारणा न केल्यास नोकियाप्रमाणे स्थिती होईल. परंतु अशी वेळ येऊ यासाठी काम सुरु आहे. येत्या तीन वर्षात हा बदल पाहायला मिळेल. एसटीची काळासोबत बदललेली सेवा असेल. पुढे जाण्यासाठी संस्थेत लवचिकता असायला हवी असेही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांवरील कारवाई बाबत गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा असायला हवी कारवाई पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरु असून भविष्यात बदल दिसेल असेही त्यांनी सांगितले.
तर पूर्वी गुजरात,तेलंगणा,आंध्रप्रदेशच्या परिवहन मंडळाची चर्चा असायची परंतु आता आपल्या एसटी महामंडळाची चर्चा आहे. चन्ने यांच्या कुशल कार्यशैलीमुळे हे शक्य झाले. विविध योजना राबविण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे असे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला
एसटी कर्मचाऱ्यांना विविध अडचणी समस्यांना सामोरे जावे लागते. चन्ने यांच्यासमोर या बाबी मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रश्न सोडविले. यामध्ये बालसंगोपन रजा , अनुकंपावर नोकरी, बडतर्फ करण्यात आलेल्या ४०० पेक्षा जास्त कामगारांना कामावर पुन्हा घेणे, अपील केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या शिक्षा कमी करणे यासह संप काळात झालेल्या वेतनवाढीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाला पत्र व्यवहार करणे यासह अनेक प्रश्न सोडवले. प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या. कोरोना आणि संपानंतर एसटी इतिहास जमा होईल अशी स्थिती होती. पण त्यातून मार्ग काढत आता एसटी उत्पन्नाचा इतिहास घडविला आहे असे असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
पुणे विभाग व त्यात बारामती आगार,एमआयडीसी आगार व विभागीय कार्यशाळा यांनी तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत दैनंदिन देखभाल व जास्तीजास्त उत्पन्न आणल्याबद्दल चन्ने यांनी नेहमी पत्र पाठवून व फोन द्वारे कामगारांची प्रशंसा करून उत्साह वाढविला असल्याचे विभागीय कार्यशाळा चे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
विविध संघटना, संस्था व कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Post a Comment