विधी क्षेत्रात केलेल्या उलेखनिय कार्यासाठी ॲड. सुप्रिया बर्गे यांना आदर्श विधिरत्न पुरस्कार जाहीर
बारामती: प्रतिनिधी
ॲड सुप्रिया बर्गे या बारामती येथे वकिली व्यवसाय करीत असून त्यांना समिजिक बांधिलकीची जाण आहे. यशश्री फाउंडेशन या संस्थेअंतर्गत जाणीव कायद्याची या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विवध स्कूल, कॉलेजेस, सामाजिक संस्था, महिला बचतगट, कंपनी या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती पर व्याख्याने दिली आहेत, केवळ व्यावसायिक दृष्टीकोण न बाळगता त्या सदैव माणुसकी जपण्यासाठी व पीडितांना न्याय मिळून देण्यासाठी कार्यरत असतात.
त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन कायदेविषयक मार्गदर्शन सल्ला देऊन १०० हून अधिक जोडप्यांना घटस्पोट घेण्यापासून रोखेले आहे .सुखी संसार कसा करावा यासाठी विवाह समुपदेशनाचे कार्य त्या करीत असतात.
त्यांचे सामाजिक, वैचारिक परिवर्तनासाठी कार्य अविरत पणे चालू असून या कार्यात त्यांचे पती ॲड. विशाल बर्गे व सासरे ॲड. विजयराव बर्गे यांनी मोलाची साथ देत असतात.
त्यांच्या कार्यास प्रेरणा देण्यासाठी माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार मधील विशेष विधी क्षेत्रातील आदर्श विधीरत्न पुरस्कार ॲड सुप्रिया बर्गे यांना जाहीर करण्यात आला आहे.
जिजाऊ रत्न पुरस्कार , भारत जोती प्रतिभा संपन्न एक्सलन्स अवॉर्ड , रिअल सुपर वूमन अवॉर्ड, वालचंद नगर इंडस्ट्रीज गुणगौरव पुरस्कार
, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गुणगौरव पुरस्कार, नवदुर्गा सन्मान आदी पुरस्कार ॲड. सुप्रिया बर्गे यांना मिळालेले आहेत.
Post a Comment