श्रुतिका,सिद्धी हिची दिल्ली येथील शालेय वेलफेअर स्पर्धेसाठी निवड
बारामती: प्रतिनिधी
बारामतीच्या श्रुतिका,सिद्धी दिल्ली येथील देशातल्या सर्वात मोठ्या शालेय स्पर्धसाठी सीबीएसई वेलफेयर कडून खेळणार आहे.
दिनांक १६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधी मध्ये छत्रसाल स्टेडियम,मॉडेल टॉऊन,दिल्ली येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण भारत देशातून सर्व राज्याच्या टीम यात सहभागी होणार आहे यास्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघामध्ये सीबीएसई वेलफेयर यांच्या राष्ट्रीय निवड चाचणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई स्कूल मध्ये डॉ. सायरस पूनावला इंग्लिश मेडीयम स्कूल कडून श्रुतिका अनिल माडचेट्टी हिची 17 वर्षाखालील ४० ते ४४ किलो वजन गटात तर न्यू बाल विकास मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल ,पिंपळीची विद्यार्थिनी सिद्धी कुणाल बोरा हिची
17 वर्षाखालील ५६ ते ६० किलो वजन गटात निवड झाली आहे.
स्पर्धेत दोघीही चांगले प्रदर्शन करतील अशी अपेक्षा त्याचे मार्गदर्शक व बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र बाळकृष्ण करळे यांनी व्यक्त केली त्याच्या निवडीबद्दल बारामती कराटे असोसिएशनच्या मार्गदर्शक व शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार व मुख्यध्यापक ,शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो ओळ:
स्पर्धेपूर्वी श्रुतिका व सिद्धी प्रशिक्षक रवींद्र कराळे समवेत
Post a Comment