शिरूर शहरात रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशनची कारवाई
पुणे दि 13
शिरुर शहरात रात्रीचे वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रोडने, जाणारे लोकांची जबर दस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या, अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या,
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषण करणेत आले, आजूबाजूचे परीसरातील गोपनीय बातमीदार सतर्क केले व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरुवात केली असता, गोपनीय वातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे आधारे सदरचे गुन्हे हे शिरूर शहरात राहणारे इसम नामे १) शिरीष सोपान जाधव, वय १९ वर्षे, रा. होलार आळी, शिरूर, ता. शिरूर जि पुर्ण २) संतोष मारूती ढोबळे, वय १९ वर्षे, रा. वाडा कॉलनी, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे यांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून दोघांना शिरूर शहरातून ताब्यात घेण्यात आले, चौकशी दरम्यान त्यांनी शिरूर शहरात चार गुन्हे केल्याचे सांगितले असून दोन्ही आरोपींचे ताब्यातून एकूण चार मोवाईल ५२,०००/- रु.किं, चे तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल रु. ४५,०००/- किच्या जप्त करणेत आलेल्या आहेत, दोन्ही आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. उघडकीस आलेले गुन्हे
१ शिरूर पो स्टे गु.र.नं. १३१८/२०२३ भादंवि ३९२,३४ | ३
शिरूर पो स्टे गु.र.नं. १३२२/२०२३ भादंवि ३९२,३४
शिरूर पो स्टे गु.र.नं. १३१९/२०२३ भादंवि ३९२,३४ ४
शिरूर पो स्टे गु.र.नं. १३३६/२०२३ भादंवि ३९२,३४
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक घट्टे,पुणे विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत गवारी साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टेचे पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप, स्था.गु.शा, कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमोण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, शिरूर पो स्टे चे पो.स.ई. एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथासाहेब जगताप, रघुनाथ हाळनोर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.
Post a Comment