News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून तालुक्यात जनजागृती

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून तालुक्यात जनजागृती

पळशी आणि लोणी भापकर येथे शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण

बारामती, दि. १२:
 केंद्र शासन पुरस्कृत योजंनाची माहिती देण्याबरोबरच नागरिकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील पळशी आणि लोणी भापकर येथे शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पंचायत समिती येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार आहे. 

या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर, आरोग्य तपासणी शिबीरे, आधारकार्डविषयक सेवा, आदी विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात येत आहे.

बारामती तालुक्यात ३६ ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पळशी व लोणीभापकर येथे शेतकऱ्यांना शेतीविषयक उपक्रमाबाबत ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच विविध योजनेची माहिती पुस्तिका, भिंतीपत्रिकेचे वाटपही करण्यात आले. तालुक्यात १३ डिसेंबर रोजी सायंबाचीवाडी आणि माळवाडी लोणी, १४ डिसेंबर रोजी काऱ्हाटी व बाबुर्डी, १५ डिसेंबर रोजी काळखैरवाडी व पानसरेवाडी, १६ डिसेंबर रोजी जळगाव सुपे व जळगाव क.प., १७ डिसेंबर रोजी भिलारवाडी व कऱ्हावागज तर १८ डिसेंबर रोजी माळेगाव खुर्द व मेडद गावात ही यात्रा येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment