जळोची मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान
होम मिनिस्टर च्या सीमा बडे मानकरी
बारामती:प्रतिनिधी
स्वतःचा संसार सांभाळत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत महिलांचा सन्मान व हळद कुंकू आणि वाण देऊन जळोची मध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.
मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी मकर संक्रांत निमित्त जळोची येथील ओम साई राम कलेक्शन च्या वतीने हळद कुंकू व महिलांच्या कलागुणांना वाव भेटावा यासाठी श्री सावळेप्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी ऍड सुप्रिया बर्गे, दर्शना जैन, अस्मिता फाळके, वंदना शिंदे, ,सुरेखा स्वामी, तृप्ती मुथा, सुलक्षणा जंगम,
आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.
सीमा बडे या होम मिनिस्टर च्या मानकरी ठरल्या सुनीता चाटे, विद्या पवार, अश्विनी जमदाडे, सुवर्णा जगताप, वैशाली ढवळे यांनी अनुक्रमे ६ नंबर पर्यंत बक्षिसे जिंकली.
वर्षभर महिला गृहणी म्हणून किंवा नोकरी ,व्यवसाय करतात त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व मनोरंजनातून त्यांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळावी,त्यांना व्यक्त होता यावे यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ओम साई राम कलेक्शनच्या संचालिका मेघा दत्तात्रय जमदाडे यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रमिला वाघमारे, प्राजक्ता जमदाडे, रिना होले,स्वप्नाली दिवेकर व विशाखा महेकर नृत्यांगना
आदी महिलांना सन्मानित करण्यात आले.
महिलांनी नृत्य, गायन, उखाणा, प्रश्न मंजुषा आदी चे सादरीकरण केले.
आभार माधुरी जमदाडे यांनी मानले
फोटो ओळ:
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या महिलांचा सन्मान करताना शेजारी मेघा जमदाडे व इतर
Post a Comment