विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सेंट्रल ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे सन्मानित
बारामती:प्रतिनिधी
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने लोणावळा येथे एमए टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम - २०२५
या कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सेंट्रल ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टार परफॉर्मर अवार्डने सन्मानित करण्यात आले
राज्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांचे टीपीओ या संघटनेचे सभासद उपस्तीत होते.
या प्रसंगी
लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्ष संजय घोणे, अभिनेत्री रुपाली भोसले , महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
माझ्या या यशामध्ये माझे सर्व सहकारी, विद्यार्थी, संस्थेचे विश्वस्त आणि कार्यकारी समितीचे सर्व सदस्य यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांच्या प्रेरणेने येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे मत डॉ. विशाल कोरे यांनी व्यक्त केले.
हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्थ सौ. सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्रदादा पवार, डॉ. राजीव शाह, किरणदादा गुजर, मंदार सिकची आणि कार्यकारी समितीचे सर्व सदस्य तसेच रजिस्ट्रार कर्नल श्रीश कंबोज यांनी डॉ. विशाल कोरे यांचे अभिनंदन केले.
फोटो ओळ: विशाल कोरे
Post a Comment